अमरनाथ यात्रेसाठी मी (प्रदीप चव्हाण ) , भारत खंदारे , वीरसे सर , मधु रेंगे हरकळ सर प्रदीप पवार , माझा चुलत भाऊ मावली चव्हाण , आणि अविनाश अस्तुरकर व इतर ४० ते ५० लोक परभणी हून निघाले होते . दिनांक ५ जुलै ते १८ जुलै २०१४
मी (प्रदीप चव्हाण ) मधुकर रेंगे , प्रदुम्न शिंदे , सुरेश बलवते , प्रवीण लोंढे , भारत खंदारे , डी जी रानगिरे गायकवाड सर , सुनील , आम्ही सर्व दिनांक ८ ९ १० सप्टेंबर २०१३ रोजी कोंकण गणपतीपुळे पन्हाळा गड , जंजिरा भीमाशंकर जोतिर्लिंग , व शिवनेरी किल्ला असा टूर काढला होता त्या आठवणी चा हा फोटो शूट आहे .
अमरनाथ यात्रेला जाण्याची इच्छा आम्हाला २ वर्षापासून
होती इ.स . २०१४ रोजी मार्च महिन्यात १० वी च्या परीक्षा सुरु होत्या आमची ड्यूटी
मराठवाडा शाळा शिवाजीनगर येथे होती आम्ही भारत खंदारे सर यांनी आमच्या कडून
पासपोर्ट फोटो इलेक्शन कार्ड ची झेरोक्स हेल्थ चेक अप व अमरनाथ यात्रा रजिस्ट्रेशन जे नांदेड किंवा
औरंगाबाद येथे होते भारत खंदारे यांनी ४ वेळा जाऊन ते रजिस्ट्रेशन केले हेल्थ चेक
अप साठी सुधा ते झरी येथील डॉ कडून सर्टिफिकेट आणले . त्यासाठी फक्त २०० रु
प्रत्येकी खर्च आला .
त्यानंतर रेल्वे रिजर्वेशन ५ मे रोजी मी भारत खंदारे , वीरसे सर आम्ही रेल्वे स्टेशन वर
सकाळी ८.०० वाजता केले काही जनाचे वेटिंग होते बाकी कन्फर्म होते .
या यात्रेसाठी
मी (प्रदीप चव्हाण ) , भारत खंदारे , वीरसे सर , मधु रेंगे सर , गुलाब हरकळ सर ,
प्रदीप पवार , माझा चुलत भाऊ मावली चव्हाण
, आणि अविनाश अस्तुरकर व इतर ४० ते ५० लोक परभणी हून निघाले होते . यासाठी फक्त
२०० रु + १६५० रु रेल्वे रिजर्वेशन साठी असा २००० रु प्रत्येकी खर्च आला होता .
मावली भाऊ चा खर्च मीच केला होता . तो येणार होता पण ऐनवेळी त्याला रजा मिळाली
नाही व त्याचे येणे रद्द झाले .
५ मे ते ४ जून
पर्येंत आम्ही यात्रेसाठी काय व कोणत्या वस्तू सोबत न्यायच्या याचा विचार करत होतो
.
आमच्या प्रवासाचे फोटो शूट
अमरनाथ यात्रेसाठी अवश्यक
यात्रेकारुसाठी सूचना
घातपाताची शक्यता सतत असल्याने मार्गामध्ये
जागोजागी भारतीय लष्कराचे जवान तैनात असतात. तसेच वेळोवेळी ते झडती देखील घेतात.
यात्रेकरूंनी जवानांना सहकार्य करावे तसेच घोडा, खेचर अथवा पालखी वाहणारे वाहक अधिकृत आहेत
की याची देखील चौकशी करावी. अधिकृत वाहकांपाशी ओळखपत्र असते. अधिकृत लंगर व
राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच रहावे अथवा भोजन नाष्टा करावा. लष्कराच्या
सूचनांप्रमाणेच मार्गाक्रमण करावे. पाऊस, हिमवर्षेची शक्यता असल्याने जरुरी गरम कपडे
व रेनकोट घेउन जावेत. साधारणपणे १०००० फुटावरती श्वसनाचा त्रास होउ शकतो, मळमळणे, डोके दुखणे, उलटी होणे या गोष्टी
होऊ शकतात. आपल्या डॉक्टरांना याबाबत विचारावे व जरुरी औषधपाणी घेउन जावे. अश्या
प्रकारचा त्रास कमी होण्यासाठी, यात्रा सुरु करण्यापुर्वी सोनमर्ग, बालताल, पहेलगाम किंवा
चंदनवाडी येथे एखाद दुसरा दिवस अतिरिक्त व्यतीत करावा तसेच यात्रा देखील टप्या
टप्याने पार पाडावी.पहेलगाम कडून जाताना जरी पालखी अथवा घोडा भाड्याने घेतला असेल
तरी साधारणपणे अतिदुर्गम ठिकाणी १.५ ते २ किमी चालावे लागतेच. याची तयारी असावी.
साध्या वातावरणात श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना यात्रेबाबत विचार करावा.
अमरनाथ मार्ग
जम्मू-काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने
अत्यंत संवेदनशील आहे. काश्मीरमधीलदहशतवादीकारवाया ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर
होत्या (९० च्या दशकात) त्यावेळेस ही यात्रा जवळपास स्थगित झाली होती. परंतु
भारतीय सरकार व लष्कराच्या मदतीने ही यात्रा पुन्हा सुरु करण्यास यश आले आहे व
दरवर्षी येथे भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी अतिरेक्यांच्या हिंसाचारात
काही भाविक मारले जातात परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्गसोनमर्ग- बालताल- अमरनाथ
च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे
पसंत करतात.
दुसरा मार्गपहेलगाम- चंदनवाडी-
पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त
खडतर आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा
मार्ग निवडतात.
यात्रेच्या मार्गामध्ये भाविकांची सोय चांगली आहे. श्वसनाचा त्रास
होत नसलेला कोणीही या यात्रेत सहभागी होउ शकतो. ज्यांना या यात्रेत चालता येत नाही
त्याच्यासाठीपालखी, घोडा, खेचर यावरुन वाहून
नेण्याची व्यवस्था आहे. बहुतांशी लोक घोडा व खेचर पसंत करतात. याचे दोन दिवसाचे
भाडे १५०० ते २००० रुपये पर्यंत असू शकते. रस्त्याम्ध्ये भाविकांची अनेक ठिकाणी
जेवणाची रहाण्याची व्यवस्था केली जाते. बहुतांशी ठिकाणी ही व्यवस्था स्वयंसेवी
संस्थांतर्फे होते. यांना लंगर असे म्हणतात. जेवणाची व्यवस्था बहुतांशी मोफत असते
राहण्याच्या व्यवस्थेला १००- १००० रुपयांपर्यंत मोजावे लागतात.
पहलगामपासून मार्गातील अंतर असे (कंसात उंची फूट):चंदनवाडी१६ कि. मी. (९५००), पिस्सू टॉप ३ कि. मी. (११०००), शेषनाग ११ कि. मी. (११७३०), महागुना स्टॉप ४.६
कि. मी. (१४०००), पंचतरणी ९.४ कि. मी. (१२०००), संगम ३ कि. मी., पवित्र अमरनाथ गुहा
३ कि. मी. (१३००० फूट).सोनमर्ग(बालताल) पासून
बराडी ५ कि. मी., संगम ४ कि. मी. पवित्र गुंफा ३ असे १४ किलोमीटर अंतर आहे.